आंदोलनाचा इशारा

 ठाणे : ठाण्यात सध्या स्मार्ट सिटीसाठी महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणाची कामे वेगात सुरू आहेत. या रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या घरांना पालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे. तर काही घरे नोटीस न देताच अनधिकृत बांधकाम म्हणून तोडून टाकली आहेत. पण ही कारवाई करताना ही बांधकामे अनधिकृत आहेत का हे पालिकेने तपासून पाहिले नाही. ही बांधकामे जर अनधिकृत असतील तर या बांधकामांना परवानगी देणाऱ्या पालिका अधिकारी-पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आली नाही? ही घरे जर अनधिकृत असतील तर या पत्त्यांवर पॅनकार्ड, आधारकार्ड, पालिकेची टॅक्स पावती, पाणी बिले कसे दिले गेले याची चौकशी आयुक्तांनी करावी अन्यथा बहुजनविकास आघाडीच्या वतीने गरिबांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केले जाईल, असा इशाराओवळा-माजिवडा विधानसभा महिला अध्यक्षा मंजुळा डाकी यांनी महापालिकेला दिला आहे.