ठाणे(जिमाका) :- जिल्हा माहिती कार्यालय ठाणे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून महिला सुरक्षा विषयावर व्याख्यानाचे दि. ६ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वा. नरेंद्र बल्लाळ सभागृह ठाणे महापालिका मुख्यालय येथे | आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महापौर नरेश म्हस्के उपस्थित राहणार असून महिला सुरक्षा या विषयावर ओनील कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे, उपायुक्त संदीप माळवी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी केले आहे.
पत्रकार दिनानिमित्त महिला सुरक्षा | विषयावर व्याख्यानाचे आयोजन