सिडकोतर्फे कच-याविषयी समस्या नोंदविण्यासाठी तक्रार क्रमांक


 नवी मुंबई: नवी मुंबई शहरामध्ये स्वच्छता राखण्यासाठी व नागरिकांकडून मोठ्या संख्येने प्राप्त होणा-या तक्रारींचे नि व । र ण करण्याच्या उद्देशाने सिडकोतर्फे कच- याविषयी तक्रारी नोंदविण्यासाठी खास प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे . शहरातील कच याच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना तक्रार क मां क ाच्या माध्यमातन कच- या संदर्भातील कोणतीही समस्या नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर पडून राहिलेला कचरा, गृहनिर्माण संस्थांमधील डेब्रिज, परिसरातील कचराकुंडी, स्वच्छता किंवा साफसाफई न केलेले रस्ते अथवा इतर कचरा आणि कचरा पेट्यांसंदर्भातील तक्रार नोंदविता येणार आहे. क्लाऊड टेक्नालांजी सिस्टीम अंतर्गत प्राप्त झालेल्या आणि उत्तर दिलेल्या तक्रारी ध्वनिमुद्रित केल्या जाणार आहेत. नागरिकांना सकाळी ९.०० ते संध्या. ६.०० वाजेपर्यंत तक्रारी नोंदविता येणार आहेत. नागरिकांना खालील नमूद केलेल्या क्रमांकांवर तक्रारी नोंदविता येतील : अ) नविन पनवेल व खांदा - ०२२-६१०५४५४१/२७४६००८० ब) खारघर - ०२२-६१०५४५४२/ २७७४२९०२ क) कळंबोली व कामोठे - ०२२-६१०५४५४३/ २७४२३२८२ नागरिकांनी या तक्रार क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करुन, स्वच्छ व हरित शहराची निर्मिती करण्यासाठी सहकार्य करावे.