मुंबई : मध्य रेल्वेकड़न २४ जलद लोकल फेऱ्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात आला. मात्र या फेऱ्यांना थांबा देण्यात आल्यानंतरही गर्दीचा सामना करावा लागत असल्याने आणखी काही जलद देसी फेऱ्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून केले जात आहे. सध्याच्या फेऱ्यांत नवीन फेयांची भर पडत त्या ३० ते ३५ फेयांपर्यंत नेण्यावर विचार असल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. दिवा स्थानकात जलद लोकल फेऱ्यांना थांबा देण्याची मागणी केली जात होती. त्यानसार एमआरव्हीसीकडन (मंबई रेल्वे विकास कार्पोरेशन) दिवा स्थानकात बारा डबा लोकलसाठी प्लंटफार्म बनवण्यात आला. १८ डिसेंबरपासून जवळपास २४ जलद फेऱ्यांना थांबाही देण्यास सुरुवात झाली. कर्जत, खोपोली, बदलापूर, कसारा, अंबरनाथ, टिटवाळा येथून सुटणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांना थांबा देण्यात आला. मात्र यात कल्याण, डोंबिवली यासारख्या जलद लोकल फेऱ्या नसल्याने गर्दीचा सामना दिवावासीयांना करावा लागला.