महापालिका निवडणूक संग्राम २१ फेब्रुवारीला

महापालिका निवडणूक मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबईसह १० महापालिकांच्या आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील १० महापालिकेच्या निवडणुकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून, २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे मतदान दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान १६ फेब्रुवारीला, तर दुसया टप्प्याचं मतदान २१ फेब्रुवारीला होणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. (पान २ वर) तर दुस-या टप्प्यात १० जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या सर्व निवडणुकांची मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जेएस. सहारिया यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात हिगोली, बीड, नादेड, उस्मानाबादलातूर, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ, औरंगाबाद, ' जालना, परभणी, वर्धा, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. तर दुस-या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे.दरम्यान, २% जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत महापालिका निवडणकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.