ठाणे: कळवा खाडीलगतच्या झोपडपट्टीवासीयांना कुठल्याही परीस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा येथे दिली. - कळवा खाडीकिनारा बांधकाममुक्त करण्याची योजना महापालिकेने आखली असून यासाठी कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या लोकाच्या पुर्नवसनसाठी लढा दिला आहे. शास्त्रीनगर परिसराचा दौरा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी येथील जनतेला १०० टक्के सहकार्य करण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी कोणालाही वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही दिली.
कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही पालकमंत्री एकनाथ शिंदे