ठाणे कट्टा विशेष! २१ व्या शतकात विविध शोध लागत असताना त्यात इलेक्ट्रॉनिक मिडीया घरबसल्या बातम्या देत असतानाही वृत्तपत्राचे महत्व अद्यापही कमी झालेले नाही. सकाळी उठल्याबरोबर प्रथम वर्तमानपत्र आणि चहा याचे समीकरण कोणी सांगायची गरज नाही. आजच्या युगात वर्तमानपत्र हे जणू मार्गदर्शक, शिक्षक, ज्ञान देणारे व्यासपीठ, हवामान, राशी भविष्य यासारखे मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या बातम्या देत असल्याने प्रत्येकाला ते हवेहवेसे वाटते. या आधुनिक काळात अनेक मोठे वर्तमानपत्राची अवस्था बिकट झाली असताना केवळ समाजसुधारणेच्या दृष्टीने आणि समाजाशी असलेले बंध मजबूत करण्यासाठी ठाणे कट्टा आता आपले स्थान निर्माण करु पाहत आहे. त्यात ठाण्यातील तसेच मानवी मनाशी निकटचा संबध असणारे वृत्तपत्र येत आहे. फक्त आणि फक्त समाजाची आपले काही आहे हे लक्षात घेवूनच ठाणे कट्टा पदापर्णात समाजात आपले स्थान निर्माण करेल यात शंका नाही. आज समाज हा अनेक गोष्टींनी पिडलेला आहे. परंतु त्या समाजाचे आपण काही तरी देणं लागतो या दष्टीने ठाणे कदा मनोरंजन, समाजजीवन सर्वसामान्यांचे प्रश्न, समाजात होणाऱ्या घडामोडी यावर जास्त भर देणार असून जनतेला विश्वासार्ह असे वर्तमानपत्र मिळणार आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणारे हे वृत्तपत्र नक्कीच समाजाला योग्य दिशा दाखवेल. एकाच वर्तमानपत्रात नागरिकांना सर्व काही मिळेल. घरी बसल्या घरचा वैद्य, सौंदर्यप्रसाधन, क्रीडा, कला या सर्व गोष्टींनी युक्त असा असणार आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य नक्कीच मिळेल. कारण वर्तमान पत्र हे जाहिरातीवर चालत असते. आपल्या सहकार्याची अपेक्षा तर आहेच. आपण नक्कीच ठाणे कट्याला उचलन धराल यात शंका नाही असे मत तुषार राजे यांनी व्यक्त केले. परिवहनच्या
ठाणे कट्टा विशेष!