ठाण्यात ७६० किलो ग्रॅम वजनाचा अमली पदार्थांचा साठा जप्त ठाणे : अ ब र नाथ च्या

 ठाणे : अबरनाथ च्या चिखलोली एमआयडीसी मध्ये असलेल्या सेंटार फार्मास्युटीकल प्रा. लिमिटेड या कंपनीवर ठाणे पोलिसांनी धाड टाकून ७६० किलोचे ड्रग्ज जप्त केले आहे. त्यात अप्राझोलम तसेच अन्य केमिकल्स असून या ड्रग्जची किंमत १९ कोटी रुपये एवढी आहे. याप्रकरणी कंपनीच्या दोन कामगारांसह चौघांना पोलिसांनी अटक केली असून यामागे आंतरराष्ट्रीय रकेट असण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या इफेड्रीननंतरची ही सर्वात मोठी कारवाई असून सेंटॉर कंपनी यानिमित्ताने वादाच्या भोवरात सापडली आहे.



ठाण्यातील आनंद दिघे टांवरजवळ दोघेजण अप्राझोलम ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती एण्टी नारकोटिक्स सेलच्या अधिकारयांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून लवक़श गुप्ता व अमित गोडबोले यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेताच सहा किलो ड्रग्ज ठाण्यात अमली पदार्थांचा आढळून आले. दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच आपण हा साठा बसवराज भंडारी व अनिल राजभर यांच्याकडून घेतल्याचे कबूल केले. भंडारी व राजभर हे सेंटार फार्मास्युटीकल्स या कंपनीत प्रॉडक्शन विभागात काम करतात.पोलिसांनी अंबरनाथच्या फार्मास्युटीकल कंपनीवर धाड टाकून सर्व विभागांची कसून तपासणी केली. कंपनीच्या पोटमाळ्यावर एका अडगळीत निळ्या रंगाचे ड्रम्स आढळून आले. ते उघडून बघताच केमिकल तसेच ड्रग्जचा मोठा साठा लपवला असल्याचे दिसते. पोलिसांनी ७६० किलो ड्रग्ज जप्त केले असून चौघांनाही तत्काळ अटक केली आहे. त्यातील लवकुश गुप्ता हा रिक्षा ड्रायव्हर असून तो अंबरनाथमध्ये राहतो. जप्त केलेल्या साठयांपैकी ४७१किलो अप्राझोलम, तर १०० किलो अन्य घातक केमिकल्स असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके आदी उपस्थित होते.सेंटार फार्मास्युटीकल्स ही औषध निर्मिती क्षेत्रातील नावाजलेली कंपनी असून ती अंबरनाथमध्ये १९८८ पासून सुरू आहे. गोवा तसेच पुण्यातदेखील ही कंपनी असून अंबरनाथमधील कंपनीत ड्रग्जचा एवढा मोठा साठा का ठेवला, तो कुठे पाठविण्यात येणार होता, याचा शोध सुरू असून संपूर्ण कारभारच संशयास्पद आहे. एफडीएच्या मदतीने जप्त केलेल्या ड्रग्जची तपासणी करण्यात येत आहे.अप्राझोलम हे एक ड्रग्ज असून औषधनिर्मितीसाठी प्रामुख्याने त्याचा वापर होतो. तसेच मानसिक उपचारावरही ते वापरले जाते. हे ड्रग्ज परदेशात नशेसाठी पाठवले जात होते काय, याचाही शोध सुरू आहे.