महिलेला डोळा मारण्याचा अधिकारही कुणाला नाही: आदित्य

मुंबई: आपला देश स्वतंत्र असून या देशात कोणतीही महिला कितीही वाजता बाहेर गेली, काहीही कपडे घातले, एकटी असेल किंवा मित्रांसोबत असेल... तिला हात लावायचा, डोळे मारायचा अधिकार नाही म्हणजे नाही, अशा शब्दांत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महिला सुरक्षेवर आपली परखड भूमिका मांडली. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत महिला सुरक्षेवर चर्चा झाली. या चर्चेत भाग घेताना आदित्य यांनी अत्यंत कळकळीने आपले विचार मांडले. महिलांच्या सुरक्षेवर महिलांपेक्षा पुरुषांनी जास्तीत जास्त बोलायला हवे, असे नमूद करत आदित्य यांनी महिला सुरक्षा ते महिला सबलीकरण अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केला. महिला सबलीकरण हा महत्त्वाचा मुद्दा असून यावर विधीमंडळात किमान दर तीन महिन्यांनी चर्चा व्हायला हवी. त्यातही महिलांपेक्षा पुरुषांना जास्त बोलण्याची संधी दिली पाहिजे. महिला महिलेबद्दल काळजीनेच बोलणार मात्र पुरुष त्यावर कसे बोलतात, हे ऐकण्यासारखे असेल, असे आदित्य म्हणाले