छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' म्हणा!

मुंबई: औरंगाबाद विमानतळाचं नामांतर करण्यात आले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद विमानतळाचं नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तशी माहिती दिली आहे. शिवसेनेसह अनेक पक्ष-संघटनांकडून औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला